Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

3/11/2016

ई-मेलचे जनक टॉमलिन्सन यांचे निधन


Tomilson

ई-मेलचे जनक टॉमलिन्सन यांचे निधन


  • पत्रव्यवहार वेगवान करून नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाचे स्थान मिळविलेल्या ‘ई-मेल’ची ५७ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवून अत्यंत वेगवान अशा क्रांतिकारी संदेशवहन पर्वाचा मार्ग प्रशस्त करणारे प्रतिभावंत तंत्रज्ञ रेमण्ड टॉमलिन्सन यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले.




  • ई-मेलची मुहूर्तमेढ रेमण्ड टॉमलिन्सन यांनी १९७१मध्ये रोवण्यापूर्वीही संगणकांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक संदेशांची देवाणघेवाण करण्याचे अगदी प्राथमिक स्वरूपातील तंत्र अस्तित्वात होते. परंतु त्यावर काही मर्यादा होत्या.




  • रेमण्ड यांनी हे तंत्र आणखी प्रगत केले व जगाच्या पाठीवरील कोट्यावधी लोकांना पूर्णपणे गोपनीय पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर संदेशाची देवाणघेवाण करणो शक्य झाले.


  • 



  • त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आताच्या इंटरनेटची ‘अर्पानेट’ ही प्राथमिक, ढोबळ आवृत्तीही विकसित केली होती.




  • ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’

  • प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये @ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते.




  • No comments:

    Post a Comment